Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorized

उमरखेड तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी बळीराम राठोड, उपाध्यक्षपदी दादाराव धुमाळे


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



उमरखेड, दि. १७ सप्टेंबर
पंचायत समिती कार्यालय, उमरखेड येथे आज तालुक्यातील सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये.सरपंच संघटना उमरखेड तालुका अध्यक्षपदी . बळीराम राठोड (सरपंच, चील्ली) यांची, तर उपाध्यक्षपदी . दादाराव धुमाळे (सरपंच, अंबाळी) यांची निवड करण्यात आली.

या निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य श्री. लक्ष्मण धुमाळे होते. तसेच. राहुल पाटील वानखेडे यांनी मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

या निवडीसाठी राहुल पाटील वानखेडे यांनी घेतलेले अथक प्रयत्न विशेषत्वाने अधोरेखित होत आहेत*. तालुक्यातील सरपंचांना एका व्यासपीठावर आणत संघटनेला व्यापक सामाजिक प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला.
बंजारा आणि आदिवासी समाजाला प्रथमच नेतृत्वाची संधी
उमरखेड तालुक्याच्या सरपंच संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी बंजारा समाजाला आणि उपाध्यक्षपदासाठी आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे. या ऐतिहासिक सामाजिक प्रतिनिधित्वामध्ये राहुल पाटील वानखेडे यांचा मोलाचा वाटा असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
बळीराम राठोड यांच्या माध्यमातून बंजारा समाजाला अध्यक्षपदाची, तर दादाराव धुमाळे यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला उपाध्यक्षपदाची संधी मिळाल्याने तालुक्यातील विविध समाजघटकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतींच्या विकासकामांना गती देणे, सरपंचांच्या अडचणी शासन-प्रशासनाच्या पातळीवर मांडणे आणि तालुक्यातील सरपंचांना संघटित करण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी सुकळी(ज.) येथील कर्तव्यदक्ष सरपंच सौ.श्रद्धा ज्ञानेश्वर बोके,धानोरा(सा.) येथील सरपंच श्री प्रकाशराव जाधव सर, अमानपूर येथील सरपंच सौ.दर्शना बाबूलाल चव्हाण, बोरी येथील सरपंच श्री धनंजय पाटील माने* हे उपस्थित होते.
या निवडीबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. बळीराम राठोड व उपाध्यक्ष श्री. दादाराव धुमाळे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
सरपंच संघटना, उमरखेड तालुका


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button