कुत्र्याच्या चाव्याने रेबीज; ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू
सवना परिसरात हळहळ; मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : तालुक्यातील सवना येथील रामदास हिरामण जाटवे (वय ४५, रा. मथुरा तांडा) यांचा कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीजची लक्षणे आढळून उपचारादरम्यान दि. १४ सप्टेंबर रोजी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ ऑगस्ट रोजी कुत्र्याने चावा घेतल्यानंतर सवना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढे डोक्याला दुखापत झाल्याचेही सांगण्यात येत असून, पाण्याची भीती, घसा आवळणे व तीव्र ताप यांसारखी लक्षणे दिसून आल्याची माहिती आहे. अखेर दि. १४ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.
महागाव तालुक्यात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित ग्रामपंचायत व नगरपंचायतीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. भटक्या किंवा संशयित कुत्र्यांपासून नागरिकांनी सावध राहावे आणि अशा कुत्र्यांची माहिती तात्काळ ग्रामसेवक अथवा नगरपंचायत प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



