Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव

वडद तलावावर मासे पकडताना संशयित विजेचा धक्का; २२ वर्षीय युवकाचा मृत्यू
एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : तालुक्यातील वडद येथे मासे पकडण्यासाठी गेल्याचा संशय असलेल्या कृष्णा रमेश गोदमले (वय २२) या युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना दि. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता घडली.
कृष्णा हा मित्रांसोबत तलाव परिसरात गेला होता. मासे पकडताना विजेचा धक्का लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सवना येथे पाठविला. पुढील तपास सुरू आहे.
कृष्णा हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने गोदमले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडद तलावावर यापूर्वीही मासेमारीदरम्यान अपघात झाल्याची माहिती असून, नागरिकांनी जीविताच्या सुरक्षिततेसाठी दक्षता घेण्याची गरज आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button