शहर
हिमायतनगर पोलीस ठाण्यात १७ सप्टेंबर ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन’ उत्साहात साजरा; पोलीस निरीक्षक लक्ष्मण केन्द्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
आज गुरुवारी, १७ सप्टेंबर २०२६ रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात भव्य ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केन्द्रे यांच्या शुभहस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी, अमलबजावणी कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांनी राष्ट्रध्वजास शिस्तबद्ध सलामी दिली. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा भाग स्वतंत्र होऊन भारतीय संघराज्यात समाविष्ट झाला होता. या ऐतिहासिक मुक्तीसंग्रामात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या तमाम हुतात्म्यांना यावेळी विनम्र अभिवादन करण्यात आले.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



