Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव

तपासणी नाक्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


बाजार समितीच्या वसुलीला मिळणार बळ; चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
कृषी उत्पन्न बाजार समिती, महागाव यांच्या मागणीनुसार विविध ठिकाणी तपासणी नाके (चेकपोस्ट) उभारण्यास सार्वजनिक बांधकाम उपविभाग, महागाव यांनी परवानगी दिल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. बाजार समितीचे सभापती रवींद्र रामराव पवार यांच्या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम विभागाने दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबतचे पत्र जारी केले आहे.
मिळालेल्या परवानगीनुसार रामा ३१३ वरील चिखली-शिरपूर, पाजीमा २८ वरील काळी-दौलत-दिग्रस, प्रजिमा २९ वरील कासोळा तसेच प्रजिमा ३८ वरील मुडाणा या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात तपासणी नाके उभारता येणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने ही परवानगी काही अटी व शर्तींच्या अधीन राहून दिली आहे. रस्त्याच्या मध्यापासून किमान १० मीटर अंतरावर तात्पुरत्या स्वरूपाचे चेकपोस्ट उभारावे, भविष्यात रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक झाल्यास संबंधित शेड तत्काळ काढून टाकावे, तसेच वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित कार्यालयाच्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली व त्यांच्या निर्देशानुसारच चेकपोस्ट उभारण्याची अटही घालण्यात आली आहे.
तसेच भविष्यात रस्ते विभाग, पोलीस विभाग किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी रद्द करण्याचे आदेश प्राप्त झाल्यास ही तात्पुरती परवानगी रद्द करण्यात येईल. सदर परवानगी दि. ३ सप्टेंबर २०२७ पर्यंत वैध राहणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या तपासणी नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती सभापती रवींद्र पवार यांनी दिली. या कॅमेऱ्यांमुळे वाहनांची ये-जा तसेच तपासणीची नोंद उपलब्ध होणार असून, अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांचे रेकॉर्डिंगही आपोआप उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यामुळे महसूल व पोलीस विभागालाही त्याचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“कृषी उत्पन्न बाजार समितीची वसुली व्यापाऱ्यांकडून नियमानुसार व्हावी, हा या कारवाईमागील प्रमुख उद्देश आहे. तपासणी नाक्यांवरील कॅमेऱ्यांमुळे व्यवहारात पारदर्शकता राहण्यास मदत होईल तसेच महसूल व पोलीस प्रशासनालाही आवश्यक नोंदी उपलब्ध होतील,” अशी प्रतिक्रिया सभापती रवींद्र रामराव पवार यांनी दैनिकाच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button