Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव

हिवरा (संगम) येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : तालुक्यातील हिवरा (संगम) येथे ४६ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हिवरा (संगम) येथील देविदास दत्ता वारंगे (वय ४६) यांनी घरी कोणीही नसल्याची संधी साधून वसरीसमोरील लाकडी फाट्यास साडीच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.
या घटनेची माहिती मिळताच हिवरा (संगम) येथील पोलीस पाटील प्रवीण कदम यांनी महागाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर महागाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, सवना येथे पाठविण्यात आला.
मृत देविदास वारंगे यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. त्यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास महागाव पोलीस करीत आहेत.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button