दहीहंडीच्या कार्यक्रमात आमदार एकाकी!
मान्यवरांची उपस्थिती नसल्याने आमदार किसन वानखेडे एकांतात बसल्याचे चित्र; उमरखेड मतदारसंघात चर्चेला उधाण

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
उमरखेड येथे १३ सप्टेंबर रोजी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमस्थळी अपेक्षित मान्यवरांची उपस्थिती दिसून न आल्याने उंबरखेड मतदारसंघाचे आमदार किसन वानखेडे हे काही काळ एकांतात बसलेले दिसून आले.
कार्यक्रमातील हे चित्र उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरले. राजकीय वर्तुळातही या प्रसंगाची चर्चा सुरू झाली असून, कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती कमी का होती? याबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.
दरम्यान, आमदार किसन वानखेडे एकटे बसलेले असल्याचे छायाचित्र/दृश्य सोशल मीडियावर चर्चेत येत असून, मतदारसंघातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या प्रसंगाकडे पाहिले जात आहे.
दहीहंडीच्या उत्साहातही आमदारांचे एकाकी बसलेले चित्र पाहायला मिळाल्याने ‘नेमके राजकीय कारण काय?’ हा प्रश्न सध्या उमररखेड मतदारसंघात चर्चेचा विषय बनला आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



