Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorized

दुसऱ्याच्या शेताची रॉयल्टी, ई-क्लास जमिनीतून लाखो ब्रास मुरूम?
भोसा येथील अवैध उत्खननाची चौकशी करून पंचनामा व वसुलीची मागणी

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील भोसा येथे ई-क्लास शासकीय जमिनीतून कथितरीत्या मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करून लाखो ब्रास मुरूम काढण्यात आल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, उत्खननासाठी दुसऱ्याच्या शेताची रॉयल्टी काढण्यात आली आणि प्रत्यक्षात ई-क्लास जमिनीतून मुरूम काढून नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून प्रत्यक्ष स्थळाचा पंचनामा करावा, अशी मागणी एकता पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशोर राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. संबंधित प्रकरणात प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास महागाव तालुक्यातील अवैध उत्खननाविरोधात उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
तलाठी-मंडल अधिकाऱ्यांकडून संयुक्त पंचनामा करण्याची मागणी
भोसा येथील उत्खननाची प्रत्यक्ष पाहणी करून तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या माध्यमातून, आवश्यक असल्यास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच उत्खनन झालेल्या जमिनीची हद्द कायम करून प्रत्यक्षात कोणत्या क्षेत्रातून किती मुरूम काढण्यात आला, याचे मोजमाप करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
जर दुसऱ्या शेताची रॉयल्टी दाखवून ई-क्लास शासकीय जमिनीतून मुरूम काढण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले, तर संबंधितांकडून शासकीय नियमानुसार रॉयल्टी, दंड व उत्खननामुळे झालेल्या नुकसानीची वसुली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
फोटो व प्रत्यक्ष परिस्थितीची चौकशी होणार का?
ई-क्लास जमिनीतून मोठ्या प्रमाणात मुरूम काढण्यात आल्याचे दर्शविणारे फोटो उपलब्ध असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे केवळ कागदावरील रॉयल्टी तपासण्याऐवजी रॉयल्टीवरील सर्वे क्रमांक आणि प्रत्यक्ष उत्खननाचे ठिकाण यांची पडताळणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
भोसा येथील या प्रकरणात नेमक्या कोणत्या जमिनीतून किती मुरूम काढण्यात आला, रॉयल्टी कोणत्या शेताची काढण्यात आली, प्रत्यक्ष उत्खनन कोणत्या जमिनीत झाले आणि शासनाचा महसूल बुडाला का, याचा खुलासा आता महसूल प्रशासनाच्या चौकशीतून होणे अपेक्षित आहे.
अवैध उत्खननाला कोणाचे संरक्षण आहे? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी किशोर राऊत यांनी केली आहे.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button