Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorized

दैनिक महासागरच्या बातमीची दखल; अंदाज समितीची मूकबधिर आश्रमशाळेवर धडक


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


शाळेत विद्यार्थी-शिक्षकांची अनुपस्थिती; किचनमध्ये अन्नधान्यही आढळले नाही, शाळा बंद करण्याच्या सूचना
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील मूकबधिर आश्रमशाळेतील कथित गैरव्यवस्थेबाबत दैनिक महासागरने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत अंदाज समितीने गुरुवार, ११ सप्टेंबर रोजी संबंधित आश्रमशाळेला अचानक भेट देऊन पाहणी केली. समितीच्या पाहणीत शाळेतील परिस्थितीबाबत अनेक गंभीर बाबी समोर आल्याचे सांगण्यात आले.
शाळेची विद्यार्थी संख्या तब्बल ६० असल्याचे नमूद असताना पाहणीच्या वेळी एकही विद्यार्थी उपस्थित आढळून आला नाही, तसेच शिक्षक व कर्मचारीही उपस्थित नसल्याचे समितीच्या निदर्शनास आले. यापूर्वी दैनिक महासागरमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तामध्ये शाळेत केवळ दोन विद्यार्थी उपस्थित असल्याचे नमूद करण्यात आले होते.
समितीने शाळेतील स्वयंपाकघराचीही पाहणी केली. यावेळी किचनमधील कोणत्याही डब्यात अन्नधान्याचा साठा आढळून आला नसल्याचे समोर आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली मुला-मुलींच्या झोपण्याची स्वतंत्र व योग्य व्यवस्था देखील आढळून आली नसल्याचे पाहणीत निदर्शनास आले.
विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकांची उपस्थिती, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था आणि शाळेतील प्रत्यक्ष सुविधा याबाबत समितीने पाहणी करून परिस्थितीची नोंद केली. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत संबंधित आश्रमशाळा बंद करण्याच्या सूचना समितीने दिल्याचे सांगण्यात येत आहे.
अंदाज समितीने या पाहणीचा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, समितीच्या अहवालानंतर संबंधित आश्रमशाळेबाबत पुढील प्रशासकीय कारवाई काय होते, याकडे आता लक्ष लागले आहे.
दरम्यान, दैनिक महासागरच्या वृत्ताची समितीने दखल घेत प्रत्यक्ष शाळेत धडक देत पाहणी केल्याने आश्रमशाळा व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहेत.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button