पावसासाठी उमरखेड ईदगाह मैदानावर नमाज-ए-इस्तिस्का चे पठण*

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
उमरखेड, ११ सप्टेंबर : मागील एक – दिड महिन्या पासून पावसाने दडी दिल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्याच्या उद्देशाने आज शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी उमरखेड येथील ईदगाह मैदानावर नमाज -ए -इस्तिस्का अदा करण्यात आली.
यावेळी सर्व मस्जिद च्या इमामा सोबत शहरातील मोठ्या संख्येने बुर्जुंग , वयस्क,तरुण ,लहान मुला सह मुस्लिम बांधव उपस्थित होते. नमाज अदा केल्यानंतर उपस्थितांनी अल्लाहकडे
“हे अल्लाह! आम्हाला असा पावसाचा पाऊस दे जो फायदेशीर, आरोग्यदायी, उपयुक्त आणि निरुपद्रवी असेल आणि ज्याला विलंब होणार नाही .”हे अल्लाह! तुझ्या सेवकांना आणि तुझ्या जनावरांना पाणी दे, तुझी दया वाढव, आणि तुझ्या मृत जमिनीला पुनरुज्जीवित कर.” अशी प्रार्थना करण्यात आली .
[ नमाज ए इस्तिस्का ही पावसा साठी अल्लाह कडे विनंती करण्याची विशेष नमाज आहे . ही नमाज ईदच्या नमाजाप्रमाणे मोकळ्या मैदानात किंवा ईदगाहमध्ये अदा केली जाते. इमामसोबत अजान किंवा इकामात शिवाय नमाजाच्या दोन रकअत अदा केल्या जातात . यात प्रवचन आणि अल्लाहकडे पश्चात्ताप आणि पापांची क्षमा मागितली जाते. चादर पलटने , उलट्या हाताने प्रार्थना करने हे परिस्थितीत बदल आणि दयेच्या आशेचे जे प्रतीक आहे. त्या बाबी विषेश करून केल्या जातात ]
. पावसाअभावी जनावरे ,शेती, पिके आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच सर्व नागरिकांवर अल्लाहची कृपा राहावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली.आजच्या या कार्यक्रमातून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या चिंता व अपेक्षा व्यक्त झाल्या.
“या अल्लाह, आपल्या रहमतीचा पाऊस बरसव आणि उमरखेडसह संपूर्ण राज्यात सुख-समृद्धी प्रदान कर.” अशी सामूहिक दुआ – प्रार्थना करण्यात आली.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



