जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत रंगत
तालुका गटातून संभाजीराव नरवाडे व पंजाबराव खडकेकरांचे अर्ज दाखल; निवडणुकीची चुरस वाढली

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे. आज ११ सप्टेंबर रोजी तालुका गटातून दोन प्रमुख उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.
महागाव येथे राष्ट्रवादीचे नेते व तालुका अध्यक्ष सिताराम ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राठोड तसेच अनुसूचित जातीचे नेते महेंद्र कावळे सर यांच्या उपस्थितीत संभाजीराव नरवाडे, माजी संचालक यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक तथा सहकार जीनचे अध्यक्ष, महागाव यांनी तालुका गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान, दीपक आडे यांच्या नेतृत्वाखाली पंजाबराव खडकेकर यांनीही तालुका गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे तालुका गटातील निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होत असून, आगामी निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दोन्ही बाजूंकडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आता निवडणूक एकतर्फी राहणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. आगामी काळात कोणाच्या पारड्यात मतदारांचा कौल पडतो, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



