Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorized

आकोली ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!

उमरखेड


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

पाच वर्षांपासून शासकीय कामांत अनियमिततेचे आरोप; ग्रामस्थांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली चौकशीची मागणी

उमरखेड प्रतिनिधी | अनिल राठोड

आकोली ग्रामपंचायतीच्या गेल्या पाच वर्षांतील विविध शासकीय कामांच्या कारभारावर ग्रामस्थांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, कामांचे लोकेशन नसताना बिले काढणे, ग्रामसभेतील ठरावांबाबत पारदर्शकतेचा अभाव आणि कामांमध्ये गैरप्रकार झाल्याची शक्यता असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
निवेदनानुसार, आकोळी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून अनेक शासकीय कामे करण्यात आली. मात्र, काही कामांचे प्रत्यक्ष लोकेशन उपलब्ध नसतानाही ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांच्या संगनमताने बिले काढण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे संबंधित कामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याशिवाय विविध कामांसाठी कंत्राटदार ग्रामसभेत गावकऱ्यांनी मागितल्यानंतरही कंत्राटदारांची माहिती ग्रामसभेसमोर सादर केली जात नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. ग्रामसभेला सरपंचासह सदस्यांची उपस्थिती आवश्यक असताना सचिव सोडून इतर पदाधिकारी किंवा सदस्य उपस्थित राहत नसल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे.

‘कामे झाली की कागदावरच?’

ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये काहीतरी गडबड असल्याची शंका बळावत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री चौकशी न करता संबंधित कामांची प्रत्यक्ष स्थळ तपासणी, कागदपत्रांची पडताळणी आणि निधीच्या वापराचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दोषी आढळल्यास कारवाईची मागणी

“आकोली ग्रामपंचायतीमधील कामांची गुणवत्ता व झालेल्या खर्चाची चौकशी करून संबंधित दोषींवर नियमानुसार कारवाई करावी,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री संजयभाऊ राठोड आणि जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनाही देण्यात आल्या आहेत.
आता प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश देणार का? की ग्रामस्थांच्या आरोपांवर पडदा पडणार? याकडे आकोली ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button