डीजेच्या दणदणाटाला कायमचा ब्रेक!
उमरखेड-महागाव-पुसद परिसरात कर्कश डीजेवर बंदी; पोलीस अधीक्षकांच्या निर्णयाचे नागरिकांकडून जोरदार स्वागत

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
उत्सवाच्या नावाखाली होणाऱ्या कर्णकर्कश डीजेच्या दणदणाटाला आता कायमचा ब्रेक लागणार आहे. उंबरखेड-महागाव-पुसद परिसरात कर्कश आवाज करणाऱ्या डीजेवर कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेचे नागरिकांकडून जोरदार स्वागत होत आहे.
आज दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी उमरखेड येथे झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस अधीक्षकांनी डीजेच्या कर्कश आवाजाबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे सण-उत्सवांच्या काळात ध्वनिप्रदूषणाचा वाढता त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि विविध सार्वजनिक उत्सवांमध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजविण्याच्या प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण तसेच लहान मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. अनेकदा उत्सवाचा आनंद हा ध्वनिप्रदूषणाच्या त्रासात बदलतो. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने घेतलेली कडक भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.
‘उत्सव साजरा करा, मात्र दुसऱ्यांच्या शांततेची किंमत मोजून नाही,’ अशी भावना या निर्णयामुळे नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. पारंपरिक वाद्ये, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तिमय वातावरणाला प्रोत्साहन देत उत्सव साजरे करण्याची गरजही यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
पोलीस अधीक्षकांच्या या निर्णयामुळे कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांची शांतता यांना प्राधान्य देणारा प्रशासनाचा संदेश स्पष्ट झाला असून, आदेशाची कठोर अंमलबजावणी होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



