हिमायतनगर शहर व परिसरामध्ये पावसाच्या ओढीमुळे पाण्याची टंचाई; उद्या शुक्रवारी दुपारी २:३० वाजता ईदगाह मैदानावर नमाज़-ए-इस्तिस्का व पर्जन्यवृष्टीसाठी सामूहिक प्रार्थना!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी – शेख खय्यूम):
हिमायतनगर शहर आणि संपूर्ण तालुका परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाऊस न पडल्यामुळे नागरिक आणि शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असून, पिण्याच्या पाण्याची आणि इतर समस्या गंभीर बनल्या आहेत. या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि सर्वशक्तिमान ईश्वराकडे पावसाची याचना करण्यासाठी उद्या शुक्रवार (जुम्मा), दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी हिमायतनगर येथे ‘नमाज़-ए-इस्तिस्का’ (बारिशसाठी विशेष सामूहिक प्रार्थना) चे आयोजन करण्यात आले आहे.
जामा मस्जिद कमिटी आणि मुस्लिम इंतझामिया कमिटी, हिमायतनगर यांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना नम्र आवाहन करण्यात आले आहे की, उद्या शुक्रवारी जुम्माच्या नमाजनंतर दुपारी ठीक २:३० वाजेपर्यंत सर्व बांधवांनी आपापल्या मशिदींमधून निघून स्थानिक ईदगाह मैदानावर एकत्र जमावे.
या वेळी उपस्थित सर्व नागरिकांनी आपल्या घरूनच वूझू करून यावे, अंतःकरणापासून पश्चात्ताप (तौबा व इस्तिग्फार) करत अत्यंत नम्रतेने आणि लीनतेने अल्लाहाच्या दरबारात पावसासाठी सामूहिक दुआ करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. परिसरात पसरलेले हे निसर्गाचे संकट दूर व्हावे आणि सर्वत्र समृद्धीचा पाऊस पडावा, यासाठी हे विशेष धार्मिक आयोजन करण्यात येत आहे.
— जानिब से (आयोजक):
जामा मस्जिद कमिटी व मुस्लिम इंतझामिया कमिटी, हिमायतनगर
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



