Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732
Uncategorized

मूल्य शिक्षण : माणूस घडविणारी शिक्षणप्रक्रिया


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732

” शिक्षणाचे अंतिम ध्येय केवळ यशस्वी व्यक्ती घडविणे नसून, एक चांगला माणूस घडविणे हे आहे.”

आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि माहितीचे युग आहे. एका क्लिकवर जगभरातील माहिती आपल्या हातात उपलब्ध होते. शिक्षणाच्या क्षेत्रातही तंत्रज्ञानामुळे मोठे परिवर्तन झाले आहे. शिक्षणाच्या स्वरूपात सहजता आणि सोपेपणा झाले आहे. स्मार्ट क्लासरूम, डिजिटल साधने, ऑनलाईन शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे विदयार्थाच्या शिकण्याच्या संधी वाढल्या आहेत. मात्र या सर्व प्रगतीसोबत एक प्रश्न महत्वाचा ठरतो – या ज्ञानाचा उपयोग विदयार्थी कोणत्या मूल्यासाठी करणार ?

ज्ञानाला जर संस्काराची गरज नसेल, तर शिक्षण अपूर्ण राहते. म्हणूनच आजच्या शिक्षणव्यवस्थेत मूल्य शिक्षणाची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे.

मूल्यशिक्षण म्हणजे काय ?

मूल्यशिक्षण म्हणजे विद्यार्थाच्या मनात चांगले विचार, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य आचरणाची जडणघडण करणारी प्रक्रिया होय. सत्य, प्रामाणिकपणा, सहिष्णूता, देशप्रेम, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरणप्रेम यांसारखी मूल्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. मूल्ये केवळ पुस्तकातील धड्यामंधून शिकविता येत नाहीत, ती अनुभवातून, कृतीतून आणि आदर्श वर्तनातून अधिक प्रभावीपणे रुजतात.

संस्काराची पहिली शाळा : कुदूंब

मुलांच्या आयुष्यातील पहिली शाळा म्हणजे त्यांचे घर आणि पहिले शिक्षक म्हणजे त्यांचे पालक. मुलं मोठ्यंचि बोलणे ऐकण्यापेक्षा त्यांचे वर्तन अधिक बारकाईने पाहतात. घरातील संवाद, परस्परांचा आदर, प्रामाणिकपणा, सहकार्य आणि गरजू व्यक्तीना मदत करणे या वृत्ती मुलांच्या मनावर खोल परिणाम करते. म्हणूनच पालकांनी मुलांना केवळ चांगले गुण मिळविण्यासाठी प्रोत्साहन न देता चांगले वागण्यासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी आणि इतरांचा आदर करण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे.

शिक्षक : मूल्यांचा जिवंत आदर्श

शाळेत मूल्यशिक्षण रुजविण्यात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. शिक्षकाचे बोलणे, वागणे, विद्यार्थ्यांशी असलेला संवाद आणि प्रत्येक विदयार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन यातून अनेक मूल्ये विद्यार्थ्यांप पोहोचतात. वेळेचे पालन करणारा शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्त शिकवितो. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणारा शिक्षक समानतेचे मूल्य शिकवित चूक झाली तर ती शांतप‌णे समजावून सांगणारा शिक्षक संवेदनशील शिकवितो. स्वतः प्रामाणिकपणे काम करणारा शिक्षक विद्यार्थ्यांसमोर प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवतो.

म्हणूनच मूल्य शिक्षणाचा सर्वात प्रभावी घडा म्हणजे शिक्षकांचे स्वतःचे आचरण

कृतीतून मूल्यशिक्षण

मूल्यशिक्षण केवळ भाषणांपुरते मर्यादित राहता कामा नये विद्यार्थाना विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतल्यास मूल्ये त्यांच्या अनुभवाचा भाग बनतात..

उदा. शाळा स्वच्छता उपक्रमातून स्वच्छता व जबाबदारी,. वृक्षारोपणातून पर्यावरण‌प्रेम, राष्ट्रीय सणामंधून देशप्रेम,

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून सामाजिक ऐक्य व विविधतेचा आदर वाचन उपक्रमातून ज्ञानाची आवड, क्रीडा उपक्रमातून शिस्त व खिलाडीवृत्ती अशा कृतीमधून विद्याथाना मूल्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो.

डिजिटल युगातील मूल्यशिक्षण

आजच्या विद्यार्थाच्या डिजिटल साधनाचे महत्व त्यांच्या जीवनात वाढले आहे. त्यामुळे पारंपारिक मूल्यांसोबत डिजिटल जगाशी संबंधित मूल्यांची जडणघडण करणेही गरजेचे आहे. इंटरनेट वरील माहितीचा योग्य वापर करणे, चूकीची माहिती पुढे न पाठविणे, इतरांच्या मतांचा आदर करणे, डिजिटल साधनांचा जबाबदारीने वापर करणे आणि ऑनलाईन संवादात सभ्य भाषा वापरणे ही देखील आजच्या काळातील महत्वाची मूल्ये आहेत.

तंत्रज्ञान हातात असणे महत्त्वाचे आहे; पण त्याचा विवेकाने वापर करण्याची मूल्यदृष्टी त्याहून महत्वाची आहे.

मूल्यशिक्षण आणि विद्यार्थी व्यक्तिमत्व

मूल्यशिक्षणामुळे विद्याश्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. त्यांच्यात आत्मविश्वास, निर्णयक्षमता, संवेदनशीलता, सहकार्याची भावना आणि जबाबदारीची जाणीव होते.

अभ्यासात चांगले गुण मिळविणारा विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो; परंतु इतरांच्या यशाचा आनंद घेणारा, अपयशातून शिकणारा गरजूला मदतीचा हात देणारा आणि समाजासाठी योगदान देणारा विद्यार्थी खऱ्या अर्थाने समृद्ध व्यक्तिमत्व बनतो.

शाळा: मूल्यांची प्रयोगशाळा

शाळा ही केवळ पुस्तकी ज्ञान देणारी संस्था नसून समाजाचे भविष्य घडविणारी जागा आहे. प्रत्येक वर्ग, प्रत्येक उपक्रम आणि प्रत्येक संवाद हा मूल्ये शिक्षणाची संधी ठरु शकतो.

विद्यार्थीच्या चुका शिक्षा देऊन संपवण्याऐवजी त्यातून शिकण्याची संधी दिली, तर जबाबदारीची भावना विकसित होते. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मोकळीक दिली, तर विचारस्वातंत्र्य विकसित होते. प्रत्येक विद्यार्थ्यांचा सन्मान केला, तर समानतेची भावना रुजते

अशा वातावरणातून शाळा ही खऱ्या अर्थाने मूल्यांची प्रयोगशाळा ” बनते. आजच्या बदलत्या जगात शिक्षणाचे स्वरूप बदलत आहे. परंतु चांगला माणूस घडविण्याचे शिक्षणाचे मूलभूत उद्दिष्ट बदलता कामा नये. ज्ञान विद्यार्थाला सक्षम करते, कौशल्ये त्याला आत्मनिर्भर बनवतात, पण मूल्ये त्याला माणूस बनवतात. म्हणून मूल्यशिक्षण ही केवळ अभ्यासक्रमातील एक संकल्पना न राहता ती शाळेच्या संस्कृतीचा, शिक्षकांच्या आचरणाचा आणि विद्यार्थाच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाली पाहिजे

” मुल्यांची पेरणी बालमनात केली, तर उद्याचा समाज अधिक सुंदर, संवेदनशील आणि सुसंस्कृत घडेल “

हीच मूल्य शिक्षणाची खरी ताकद आणि शिक्षणव्यवस्थेची खरी जबाबदारी आहे.

कु. वंदना पंजाबराव चव्हाण स.शि
जि.प. प्राथ शाळा चिरंगवाडी
केंद्र गौळ खु ता. पुसद
जि. यवतमाळ
मो. क्र. 9527728362


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button