Uncategorized

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला सुरुवात; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया आज, दि. ७ सप्टेंबर २०२६ पासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाल्याने प्रत्यक्ष निवडणूक रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयात इच्छुक उमेदवार, समर्थक व प्रतिनिधींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी विविध इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
महागाव तालुक्यातील जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे स्थानिक राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक संचालक म्हणून तीन टर्म पूर्ण केलेले प्राध्यापक शिवाजी राठोड काँग्रेसकडून, तर शिवाजी देशमुख यांच्यासह माजी संचालक बाजीराव नरवाडे आणि धनाजीराव नितीन भुतडा हेही फॉर्म भरणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात शिवाजी संभाजी जिंकणार की धनाजी जिंकणार, यावरून निवडणुकीची रंगत वाढण्याची चिन्हे आहेत. महागाव तालुक्यातील उमेदवारांच्या राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी उपनिबंधक कार्यालयात झालेली गर्दी पाहता जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button