शहर
हिमायतनगर वॉर्ड क्र. १३ मध्ये आज दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी नगराध्यक्ष शेख रफीक महेबूब यांच्या हस्ते स्वतः बोरवेलचे बटन दाबून व मोटरद्वारे पाणी चालू करून पाणीपुरवठा योजनेचा भव्य शुभारंभ!

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम)
हिमायत नगर शहरातील वॉर्ड क्रमांक १३ मधील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण दूर करण्यासाठी, नगरसेवक सरदार खान खलील खान पठान यांच्या विशेष विनंती व प्रयत्नांनुसार, नगराध्यक्ष शेख रफीक शेख महेबूब यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन बोरवेल व मोटर बसवून पाणीपुरवठा योजना यशस्वीरीत्या सुरू करण्यात आली.
आज दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष शेख रफीक शेख महेबूब यांनी स्वतः आपल्या हाताने बोरवेलचे बटन दाबून पाणी चालू केले व पाणी बाहेर येईपर्यंत सर्व परिस्थितीची पाहणी केली.
शुभहस्ते उद्घाटन व मार्गदर्शन:
शेख रफीक शेख महेबूब (नगराध्यक्ष, नगर पंचायत हिमायतनगर)
विशेष प्रयत्न व विनंती:
सरदार खान खलील खान पठान (नगरसेवक, वॉर्ड क्र. १३)
प्रमुख उपस्थिती:
अरशद भाई, महमूद खान, अजीज बाबा



