Uncategorized

कलगाव शिवारात बिबट्याचा वावर; शेतकरी व ग्रामस्थ भयभीत


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : महागाव तालुक्यातील कलगाव शिवारात बिबट्याचा वावर असल्याची घटना समोर आल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास महागाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी कैलास मुखाडे व विवेक पारटकर हे गस्तीवर असताना त्यांना रस्त्यालगत बिबट्या दिसून आल्याचे सांगण्यात आले.
रात्रीच्या वेळी रस्त्यालगत बिबट्या दिसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी सतर्कता बाळगली. या घटनेनंतर कलगाव परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये चिंता वाढली आहे.
सध्या पावसाळ्यात शेतातील पिकांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून, शेतकरी पहाटेपासूनच शेतीच्या कामासाठी शिवारात जात आहेत. अशा परिस्थितीत बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आल्याने शेतकऱ्यांना भीतीच्या वातावरणात शेतीची कामे करावी लागत आहेत.
यापूर्वीही महागाव तालुक्यातील विविध भागांत बिबट्याच्या वावराच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे वन विभागाने कलगाव शिवारातील बिबट्याच्या हालचालींचा तातडीने शोध घ्यावा, आवश्यक ठिकाणी कॅमेरे बसवून निगराणी करावी आणि गरज भासल्यास पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने शेताकडे जाणे टाळावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना एकटे शिवारात पाठवू नये. बिबट्या आढळल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
वन विभागाने कलगाव परिसरात गस्त वाढवून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि शेतकरी व ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button