शहर

पावसाने फिरवली पाठ: हिमायतनगरचा शेतकरी भीषण संकटात; “दोन-तीनदा पेरणीला पैसा आणायचा कुठून?”


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): परिसरात पावसाने मारलेल्या दडीमुळे बियाणे मातीतच करपले असून शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. “पहिल्या पेरणीसाठी कर्ज काढले, आता दोन-तीन वेळा पेरणी करायला गरीब माणसाने पैसा कुठून आणायचा?” असा हताश सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
​आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि शासकीय नियमांनुसार, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. बँकांकडून सहजासहजी नवीन कर्ज न मिळणे आणि सोयाबीन-कापसाचे पीक करपल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. विहिरी कोरड्या पडल्याने पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
​शेतकऱ्यांची मागणी: शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत नियमानुसार तातडीने वस्तुस्थितीदर्शक पंचनामे करावेत. बाधित शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे, पीक विमा भरपाई आणि सानुग्रह आर्थिक अनुदान त्वरित वितरित करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button