कर्तव्यनिष्ठ सेवेचा सन्मान! उत्कृष्ट सेवा पदकाने PSI शरद लोहकरे यांचा गौरव!

उमरखेड : यवतमाळ पोलीस दलात गेल्या चार वर्षांपासून पुसद सिटी पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ आणि सध्या उमरखेड पोलीस स्टेशन येथे निष्कलंक व उल्लेखनीय सेवा बजावणारे दबंग, डॅशिंग PSI शरद गिरजू लोहकरे यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना १५ ऑगस्ट २०२६ स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले आहे.
आपल्या कार्यकाळात खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, बाईक चोरी यांसारख्या अनेक आव्हानात्मक गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकाळात त्यांच्या नावावर जवळपास २५० रिवॉर्ड प्राप्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि निष्कलंक पोलीस सेवेला मिळालेली ही मानाची पोहोचपावतीच!
उत्कृष्ट सेवा पदकाचे मानकरी PSI शरद गिरजू लोहकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
तसेच उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
जय हिंद!



