शहर

नांदेडमधील फेरीवाल्यांच्या धडक मोर्चाचे हिमायतनगरमध्ये उमटले पडसाद; मनपाच्या कारवाईविरोधात संताप

( प्रतिनिधी शेख खय्यूम):
नांदेड महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून शहरातील छोट्या फेरीवाल्यांवर होत असलेल्या अन्यायकारक कारवाईविरोधात ‘सीटू’ संलग्न नांदेड महानगर हॉकर्स युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि मनपावर १८ मे रोजी एक प्रचंड धडक मोर्चा काढण्यात आला. तळपत्या उन्हाची तमा न बाळगता हजारो कष्टकरी फेरीवाले आपल्या हक्कासाठी या आंदोलनात रस्त्यावर उतरले होते, ज्याचे तीव्र पडसाद आता हिमायतनगर तालुक्यातही उमटू लागले आहेत.
​राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची पायमल्ली केल्याचा आरोप
पूर्वी संघटनेने केलेल्या संघर्षामुळे मनपा प्रशासनाने ‘हॉकर्स झोन’ तयार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची उघडपणे पायमल्ली करत गरिबांचा रोजगार हिरावून घेतला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे राजकीय पुढाऱ्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे धैर्य मनपा दाखवत नसल्याने प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र टीका होत आहे.


​या मोर्चासाठी ९ मे रोजीच्या मेळाव्यातच नियोजन करून गांधी नगर, महावीर चौक, वजीराबाद, टिळक नगर, आनंद नगर, तरोडा नाका आणि श्रीनगर भागात विशेष शाखा स्थापन करण्यात आल्या होत्या. या आंदोलनाला हिमायतनगर येथील सामाजिक व व्यापारी वर्गातूनही पाठिंबा दर्शवला जात असून, प्रशासनाने तात्काळ हॉकर्स झोनची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button