Uncategorized

पीक विमा रखडल्याने शेतकरी संतप्त; माजी आमदार जवळगावकरांनी कृषीमंत्र्यांकडे केली लेखी तक्रार


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):

हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील अनेक मंडळांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यात अद्यापही पीक विम्याची रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विमा रकमेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा, अशी ठाम मागणी करत हदगाव-हिमायतनगर विधानसभेचे लोकनेते माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांनी राज्याचे कृषीमंत्री मा. ना. श्री दत्तात्रय भरणे मामा यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर तक्रार सादर केली.
​मुख्य मागण्या व तक्रारीचे मुद्दे:
​प्रशासकीय दिरंगाई: विमा कंपनी आणि संबंधित विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे हजारो पात्र शेतकरी अद्यापही विम्याच्या रकमेपासून वंचित आहेत.
​शेतकऱ्यांचा आर्थिक मनस्ताप: खरीप हंगाम तोंडावर असताना हक्काचा विमा न मिळाल्यामुळे शेतकरी बांधवांना पुढील शेतीकामांसाठी मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
​तात्काळ निधी वितरणाची मागणी: तालुक्यातील उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम कोणतीही तांत्रिक सबब न सांगता तातडीने जमा करण्यात यावी.
​शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांनी, शासनाने या गंभीर विषयात तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास तीव्र पावले उचलली जातील, असा इशाराही यावेळी दिला. कृषीमंत्र्यांनी यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button