Uncategorized

मिस अँड मिसेस किड्स विदर्भ २०२६’ची यवतमाळात १६ ऑगस्टला ऑडिशन


महागाव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
महिलांसह लहान मुलांच्या कलागुणांना, आत्मविश्वासाला आणि व्यक्तिमत्त्व विकासाला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘मिस अँड मिसेस किड्स विदर्भ २०२६’ या स्पर्धेचे यवतमाळ येथील ऑडिशन १६ ऑगस्ट रोजी शिवशक्ती लॉन्स येथे आयोजित करण्यात आले आहे.
ओम ट्रस्ट प्रस्तुत या उपक्रमाच्या माध्यमातून विदर्भातील महिला आणि मुलांना आपल्या कला, कौशल्य व व्यक्तिमत्त्वाची प्रभावी ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेची ऑडिशन्स विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार असून, त्यातून निवड झालेल्या स्पर्धकांना पुढील फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
यवतमाळ येथील ऑडिशन १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे. महिला स्पर्धकांसाठी ब्लू जीन्स व ब्लॅक टी-शर्ट असा ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. लहान मुलांना त्यांच्या पसंतीनुसार आकर्षक व योग्य पोशाखात सहभागी होता येणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश महिलांना केवळ सौंदर्य स्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या आत्मविश्वासाला, कलागुणांना आणि व्यक्तिमत्त्व विकासाला वाव देणे हा आहे. तसेच लहान मुलांमध्ये स्टेज कॉन्फिडन्स, सादरीकरण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.
स्पर्धेचा ग्रँड फायनल ऑक्टोबर २०२६ मध्ये नागपूर येथे होणार असल्याची माहिती आयोजक विशाल डहाळे यांनी दिली.
यवतमाळ जिल्ह्यातील इच्छुक महिला तसेच पालकांनी आपल्या मुलांसह मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button