Uncategorized

महागावात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; आरोग्य विभागाच्या पत्राने खळबळ! बोगस डॉक्टरांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश; औषधसाठा आढळल्यास पोलिसांमार्फत कारवाईची मागणी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात बोगस बंगाली डॉक्टरांच्या सुळसुळाटामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या डॉक्टरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने दिनांक 29 7 2026 रोजी सहाय्यक आयुक्त अन्न वऔषध प्रशासक डॉक्टर माणिकराव यवतमाळ यांचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र देऊन तपासणी व आवश्यक कारवाईचे निर्देश दिले आहेत.
एकता पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशोर भिमराव राजत यांनी महागाव परिसरातील बोगस बंगाली डॉक्टरांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, यवतमाळ यांनी संबंधित तक्रारीची दखल घेत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.
पत्रात बोगस डॉक्टरांबाबत तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच तपासणीदरम्यान औषधांचा साठा आढळल्यास पोलिस विभागामार्फत तातडीची कारवाई करून आवश्यक औषधांचे नमुने तपासणीसाठी कार्यालयाकडे पाठवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी यवतमाळ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. त्यामुळे महागाव तालुक्यातील कथित बोगस डॉक्टरांवर आता प्रत्यक्ष कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बोगस डॉक्टरांकडून अनधिकृत उपचार होत असल्यास नागरिकांच्या जीविताशी थेट संबंध येत असल्याने प्रशासनाने केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष तपासणी व कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button