शहर

प्रसार माध्यमांना आंतरराष्ट्रीय कीर्ती!प्रेस मीडिया लाईव्हच्या ‘अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी’ पुस्तकाची जागतिक नोंद; मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान सन्मानित!

पुणे : पत्रकारिता आणि सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांनी सातत्याने ठसा उमटवणाऱ्या प्रेस मीडिया लाईव्ह या वृत्तसंस्थेने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश संपादन केले आहे. प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या “अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी”या इंग्रजी, हिंदी आणि उर्दू अशा तीन भाषांमधील महत्त्वपूर्ण पुस्तकाची दखल घेऊन ‘हाय वाईब वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये अधिकृत नोंद करण्यात आली आहे.

उच्च शिक्षण, विद्यापीठीय रचना आणि सामाजिक संदर्भांवर प्रकाश टाकणाऱ्या या बहुभाषिक ग्रंथाची निर्मिती हे एक अत्यंत स्पृहणीय आणि मार्गदर्शक कार्य ठरले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रेस मीडिया लाईव्ह चे मुख्य संपादक श्री. मेहबूब सर्जेखान यांना आंतरराष्ट्रीय सन्मानपत्र प्रदान करून विशेष गौरवाने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय कीर्तीवर मिळालेला हा त्यांचा पाचवा मानाचा सन्मान ठरला आहे!

श्री. मेहबूब सर्जेखान यांनी केवळ बातमीदारीपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने विपुल लेखन केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘नशाबंदी’सारख्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विषयावर राज्यव्यापी जनजागृती घडवून आणली होती, ज्याची दखल घेत इतर राज्यांनीही त्यांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक विषयांवर माहितीपूर्ण लेख, पुस्तके आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी आपल्या *प्रेस मीडिया लाईव्ह या माध्यम संस्थेला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या या पाचव्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button