कायदेशीर सूचना : जंतर-मंतर आंदोलनातील विद्यार्थ्यांसाठी मोफत कायदेशीर मार्गदर्शन

दिल्ली येथील जंतर-मंतर परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली असल्यास, नोटीस दिली असल्यास किंवा कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागत असल्यास घाबरून जाऊ नये, असे आवाहन ॲड. संजीवकुमार जाधव, उमरखेड यांनी केले आहे.
संबंधित विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी कायदेशीर हक्क, न्यायालयीन प्रक्रिया, जामीन, नोटीसला उत्तर देणे किंवा इतर कायदेशीर बाबींविषयी मार्गदर्शनासाठी खालील विधिज्ञांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क :
- ॲड. महेश वानखेडे – मो. 7972926005
- ॲड. रवी गव्हाळे – मो. 7264882984
याबाबत ॲड. संजीवकुमार जाधव यांनी सांगितले की, कायद्याची प्रक्रिया शांततेने आणि कायदेशीर मार्गाने हाताळणे महत्त्वाचे आहे. कोणतीही नोटीस, समन्स किंवा पोलिसांकडून संपर्क आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित कायदेशीर सल्ला घ्यावा.
ही सूचना ॲड. संजीवकुमार जाधव, उमरखेड यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.



