Uncategorized

महागाव तालुक्यात एका दिवसात दोन दुर्दैवी घटना; एकाचा पाण्यात बुडून तर अल्पवयीन मुलाचा अपघाती मृत्यू


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात गुरुवारी दोन वेगवेगळ्या दुर्दैवी घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पहिल्या घटनेत, प्रकाश किसन दिघाडे (वय 58), रा. वडद यांचा पिंपळगाव लघु प्रकल्प धरणात पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावातील नागरिकांनी याबाबत माहिती दिल्यानंतर महागाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशोर मुरकुटे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी सवना येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
याच दिवशी सकाळी महागाव–कलगाव मार्गावरील उड्डाणपुलावर अनिल गजानन राठोड (वय 17), रा. आंबोडा या अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पीएसआय किशोर मुरकुटे व बीट जमादार ऐडतकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, अनिल याला फिट आल्याने तो डिव्हायडरवर पडला आणि त्याचा अपघाती मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
एकाच दिवशी घडलेल्या या दोन दुर्दैवी घटनांमुळे महागाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button