Uncategorized

अखेर त्या परिचर पदभरतीला लागला ब्रेक? ग्रामपंचायत प्रशासक व सदस्यांनी केलेल्या आक्षेपानंतर आरोग्य विभागाची भूमिका; भरती प्रक्रियेवर तात्पुरती स्थगितीची शक्यता


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, पोहेदुळ अंतर्गत हिवरा (उपकेंद्र) येथे सुरू असलेल्या अंशकालीन स्त्री परिचर पदभरती प्रक्रियेवर अखेर ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासक व काही सदस्यांनी भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ती रद्द करण्याची मागणी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, या पदासाठी पाच महिलांनी अर्ज केले होते. मात्र, प्रशासक, ग्रामसेवक व काही सदस्यांनी आरोग्यासारख्या गंभीर विषयात अल्पशिक्षित महिलेची निवड झाल्याबाबत आक्षेप नोंदविला. त्यानंतर उपसरपंच शरद कदम व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन चौकशी व कारवाईची मागणी केली.
दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाने अद्याप कोणतीही नवीन परिचर भरती प्रक्रिया राबवू नये, असे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हिवरा उपकेंद्रातील परिचर भरती प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता या प्रकरणात जिल्हा प्रशासन अंतिम निर्णय काय घेणार, याकडे ग्रामस्थांसह संबंधित उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button