Uncategorized

कुटुंबाला जीवे मारण्याची व बदनामीची धमकी देत विवाहितेवर अत्याचार दोन संशयितांविरोधात महागाव पोलिसांत गुन्हा; एकाला अटक, एक फरार


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील वडद येथे २७ वर्षीय विवाहितेवर जीवे मारण्याची व बदनामी करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून महागाव पोलिसांनी दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
तक्रारीनुसार, सुमारे आठ दिवसांपूर्वी पीडित महिला शेताच्या रस्त्याने जात असताना गावातील मारोती तुळशीराम गोडमले (वय २१) याने तिला जबरदस्तीने शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना कोणाला सांगितल्यास तिच्या पतीला व मुलांना जीवे मारण्याची तसेच गावात बदनामी करण्याची धमकी दिल्याने पीडित महिला भीतीपोटी गप्प राहिली.
त्यानंतर २० जुलै रोजी दुपारी सुमारे २ वाजता भरत उर्फ भैय्या बाळू देवकते (वय २५) याने तिचा नवरा तिला मारण्यासाठी कुऱ्हाड घेऊन येत असल्याचे सांगून तिला जवळील गोठ्यात नेले. तेथे गोठ्याचा दरवाजा बंद करून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर पीडित महिलेने सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून भरत उर्फ भैय्या देवकते याला अटक केली आहे. तर मारोती गोडमले हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सेवानंद वानखेडे व उपपोलीस निरीक्षक सरस्वती राठोड करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button