शहर

उमरखेडचा सुपुत्र अग्निवीरमध्ये निवड; ढाणकी पोलीस चौकीत जंगी सत्कार

सहसंपादक शेख मुजाहिद

उमरखेड येथील शेख तोहिद अहमद शेख आयुब यांची भारतीय सशस्त्र दलाच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत यशस्वी निवड झाल्याबद्दल दिनांक २२ जुलै २०२६ रोजी ढाणकी पोलीस चौकी येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.

नागपूर येथे सहा महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून ढाणकी येथे मामा यांच्या घरी आगमन झाल्यानंतर बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिंदे साहेब, वरिष्ठ पत्रकार स्वप्निल चिकाटे, खालिद भाई, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेख तोहिद अहमद यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी त्यांचे मामा, सामाजिक कार्यकर्ते शेख जब्बार यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी शेख तोहिद अहमद यांनी युवकांना प्रेरणादायी संदेश देताना सांगितले, “मेहनत करा, उद्दिष्ट ठेवा आणि देशसेवेसाठी सदैव सज्ज व्हा.” त्यांच्या या संदेशामुळे उपस्थित युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

देशसेवेसाठी युवकांना प्रेरणा देणाऱ्या अशा यशस्वी तरुणांचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी असून, अशा गौरवामुळे इतर विद्यार्थ्यांनाही सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा मिळते. शिस्त, परिश्रम आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांचा हा गौरव असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

अग्निवीर भरतीत मिळवलेले हे यश उमरखेड तालुक्यासाठी अभिमानास्पद असून, शेख तोहिद अहमद यांच्या भावी सेवाकाळासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button