Uncategorized

हिमायतनगर: मृग नक्षत्रापासून आज ११ जुलैपर्यंत एकही मोठा पाऊस नाही; तालुक्यात पिके करपली, बळीराजा संकटात!


​ हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम)
​हिमायत नगर: चालू खरीप हंगामातील मृग नक्षत्र सुरू झाल्यापासून ते आज ११ जुलै २०२६ उजाडला, तरी हिमायत नगर शहर व परिसरात अजूनही एकही जोरदार (मोठा) पाऊस झालेला नाही. केवळ किरकोळ पावसावर शेतकऱ्यांनी धाडस करून पेरण्या तर केल्या, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे आता ती कोवळी पिके शेतातच करपून जात आहेत. कडक ऊन आणि पाण्याचा अभाव यामुळे पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली असून, तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढावले आहे. “पाऊस येईल” या आशेवर बसलेल्या बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे लागले असून, प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी तात्काळ परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन पिकांचे पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी संपूर्ण तालुक्यातून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button