शहर

महागावात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज, दि. २१ जून २०२६ रोजी महागाव येथे पतंजली योग समितीच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंचायत समिती सभापती कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी डॉ. भेंडे व गंगंमवार यांनी विशेष पुढाकार घेतला.
कार्यक्रमादरम्यान विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यानधारणेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. उपस्थितांना योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावून सांगण्यात आले. निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवनशैलीसाठी योग हा अत्यंत प्रभावी मार्ग असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले.
योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी असून नियमित योगाभ्यासामुळे व्यक्तीचे सर्वांगीण आरोग्य सुदृढ व सक्षम होते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी समाज निर्मितीस हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास योगप्रेमी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उपस्थितांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प करून योगमय जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button