मौलाना आझाद विकास महामंडळाकडून कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांचे व्याजमाफी करण्याची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतली मोहम्मद नाजीम रजवी यांची मागणीची दखल सचिवांना दिले सूचना
कळमनुरी,महाराष्ट्र राज्य शासनाकडून अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत शैक्षणिक कर्ज व व्यापार साठी मुदत कर्ज असे वाटप करण्यात येत असून मागील वर्षात या योजनेतील लाभार्थ्यांना महामंडळाकडून कर्ज वाटप करण्यात आले आहे परंतु सगळीकडे दुष्काळा सारखी परिस्थिती असून बाजारपेठ ठप्प असून व्यापारी परेशान आहे शैक्षणिक कर्ज घेतलेल्या बेरोजगार युवकांना नोकरी मिळाली नाही पण ज्या लाभार्थ्यांनी या महामंडळाकडून कर्ज घेतलेले आहे त्यांना महामंडळाकडून व्याजासहित कर्ज भरण्याचे वारंवार सूचना देण्यात येत आहे यामुळे शैक्षणिक कर्ज घेतलेले विद्यार्थी व मुदत कर्ज घेतलेले व्यापारी वर्ग हे परेशान झाले असून महामंडळाचे कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे ऐवढी रक्कम उपलब्ध होत नाही आणि महामंडळाकडून व्याजावर व्याज लावण्याचे काम सुरू आहे म्हणून सदरील लाभार्थ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने महामंडळाने लावलेले कर्जावरील व्याज तात्काळ कमी करून माफ करण्यात यावे अशी मागणी मुंबई येथे कळमनुरी चे उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे केली आहे या निवेदनावरून उपमुख्यमंत्री महोदयांनी अल्पसंख्यांक विकास विभागाचे सचीवांना सादर करण्याचे असे दिले सुचना सदरील लाभार्थ्यांचे व्याज माफ झाल्यास अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल
____________ मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडे नवीन लाभार्थ्यांचे संचिका प्रलंबित असून ते तात्काळ मंजूर करण्यात यावे
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिलेला असून अल्पसंख्यांक समाजासाठी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला. पाचशे कोटी ची निधीचे तरतूद केलेली असुन त्यानुसार महामंडळाच्या वतीने काय लाभार्थ्यांना कर्ज देण्यात आलेले आहे परंतु बरेच लाभार्थ्यांची नवीन कर्ज मागणीचे संचिका महामंडळाकडे प्रलंबित असून याच तात्काळ मंजुरी देण्यात यावी व नवीन लाभार्थ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी कळमनुरी चे उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी यांनी केली आहे



