शहर

80 वर्षीय शेतकऱ्याला न्यायासाठी उपोषणाची वेळ; प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तहसील कार्यालयात 2023 पासून सातत्याने चकरा मारूनही शेतकऱ्यांचे साधे प्रश्न मार्गी लागत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. टेकाळे कुटुंबाचे प्रकरण हे त्याचे ज्वलंत उदाहरण मानले जात असून, तब्बल 80 वर्षे वय असलेल्या संबंधित ज्येष्ठ शेतकऱ्याला अद्याप न्याय मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
वारंवार अर्ज, पाठपुरावा आणि कार्यालयीन फेऱ्या करूनही प्रश्न निकाली न निघाल्याने टेकाळे कुटुंबाने उपोषणाचा इशारा दिला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाला आपल्या हक्कासाठी उपोषणास बसण्याची वेळ येत असेल, तर महसूल प्रशासनाची कार्यपद्धती आणि सर्वसामान्यांना न्याय मिळविण्याची व्यवस्था किती प्रभावी आहे, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
शेतकऱ्यांच्या मूलभूत महसुली प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असताना काही निवडक कामांना प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे टेकाळे कुटुंबाच्या प्रकरणाची तातडीने चौकशी करून न्याय द्यावा व भविष्यात इतर शेतकऱ्यांवर अशी वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button