शहर

वादग्रस्त अधिकाऱ्याच्या नियुक्तीवर आक्षेप; चौकशी करून कार्यकारी पदावरून हटवण्याची मागणी (भाग २)


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागावचे तहसीलदार म्हणून नियुक्त करण्यात आलेले श्री. अभय मसके यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत संबंधित नागरिक व संघटनांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात संभाजीनगर येथे नगर पालिका प्रशासन अधिकारी तथा तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांच्यावर निधी वाटपातील कथित गैरव्यवहाराचे आरोप झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, नगर पालिका विकासासाठी प्राप्त निधीचा अपेक्षित वापर न झाल्याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशीत आर्थिक अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला असून, त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. तसेच अपहार, बनावट कागदपत्रे तयार करणे आदी गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असल्याचाही उल्लेख निवेदनात आहे. जगदीश नरवाडे संस्थापक अध्यक्ष जन आंदोलन आधार संघर्ष समिती यांनी उपयुक्त्याची भेट घेऊन लेखी स्वरूपात मागणी केली आहे.
निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर त्यांची महागाव येथे तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी, त्यांच्याविरोधातील तक्रारी आणि सध्याच्या कामकाजाची पद्धत यांची सखोल चौकशी करून त्यांना कार्यकारी पदावरून हटविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महागाव मध्ये कोणते शेतकऱ्याची कामे होत नसताना शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत असे प्रकरण तसेच शेतकऱ्याचे रस्त्याचे प्रश्न प्रलंबित आहे भ्रष्टाचार मार्गाने आर्थिक देवाण-घेवाण करून फोरविलर गाडी घेऊन फिरतात परंतु कार्यालयामध्ये येत नाही शासकीय गाडीवर वसुली करणारा प्रायव्हेट व्यक्ती महसूल डिपार्टमेंटची गाडी चालवतो व जेवणाच्या पार्टीवर नेहमी गाडी उभी असते अशा अधिकाऱ्याच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांच्या काळात झालेल्या कामाची चौकशी व कारवाई होणे आवश्यक आहे
दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नसून प्रशासनाकडूनही अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही. आमच्या प्रतिनिधीने त्यांना त्यांची प्रतिक्रिया काय हाय असे व्हाट्सअप वर विचारले परंतु त्यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही त्यामुळे या प्रकरणाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button