शहर

न्यायाच्या प्रतीक्षेत ७९ वर्षीय शेतकरी; तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील सवना येथील ७९ वर्षीय शेतकरी किसन कोंडबा टेकाळे यांनी आपल्या प्रलंबित अर्जावर न्याय मिळत नसल्याचा आरोप करत तहसील कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. अभय मस्के तहसीलदार आल्यापासून सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळणे कठीण झाले आहे न्याय मिळण्यासाठी वयोवृद्ध माणसाला उपोषणास बसावे लागते ही मोठी शोकांतिका आहे यासंदर्भात त्यांनी तहसीलदार, महागाव यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनानुसार, मौजा सवना येथील त्यांच्या शेतातून शेजारील शेतकऱ्यांकडून येणारे पाणी सोडण्यात येत असून त्यामुळे त्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी ३ ऑगस्ट २०२३, ७ मार्च २०२४, ३ जुलै २०२४ तसेच ९ सप्टेंबर २०२४ रोजी तहसील कार्यालयात अर्ज सादर केले होते. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप न्याय मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वयाच्या ७९ व्या वर्षीही न्यायासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची खंत व्यक्त करत, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा दि. २१ जून २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर कुटुंबासह बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.
या प्रकरणी महसूल प्रशासन काय भूमिका घेते आणि संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळतो का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button