हिमायतनगर येथील ‘इक्रा प्रिस्कूल’मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम)
: शहरातील आंबेडकर चौक, फेमस मॉलच्या समोर असलेल्या नामांकित ‘इक्रा प्रिस्कूल’ मध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या शाळेत नर्सरी, एलकेजी आणि युकेजीचे वर्ग असून, २.५ वर्षे ते ५.५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी प्रवेश खुले करण्यात आले आहेत.
लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या संगोपनासाठी शाळेत खेळ व कृतीवर आधारित आधुनिक शिक्षण दिले जाते. त्यासोबतच अनुभवी व काळजीवाहू शिक्षिका, सुरक्षित वातावरण आणि स्वच्छ, रंगीबेरंगी बालस्नेही वर्गखोल्या ही या प्रिस्कूलची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाचे शुल्क अतिशय माफक ठेवण्यात आले असून, यामध्ये १,००० रुपये प्रवेश शुल्क आणि ६,००० रुपये वार्षिक शुल्क अशी एकूण ७,००० रुपये फी आकारली जाणार आहे. आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रवेशासाठी पालकांनी ८६०५०७९८३१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.



