शहर

महागाव येथे ‘एकता पत्रकार संघ’ची स्थापना; पदाधिकाऱ्यांची निवड


महागाव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
: लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांच्या हितासाठी महागाव येथे एकता पत्रकार संघ या नव्या पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली. मंगळवार दि. २ जून २०२६ रोजी विश्रामगृह, महागाव येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते संघटनेची कार्यकारिणी निवड करण्यात आली.
यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी एस. के. शब्बीर, उपाध्यक्षपदी किशोर राऊत तर सचिवपदी लखन लोटे यांची निवड करण्यात आली. तसेच संजय नागरगोजे यांची समन्वयकपदी, तर प्रवीण कावळे व रविराज कावळे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.
बैठकीत पत्रकारांच्या विविध समस्या, त्यांच्या हक्कांचे संरक्षण तसेच संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांमध्ये एकोपा निर्माण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महागाव तालुक्यातील पत्रकारांच्या एकजुटीसाठी व पत्रकार हिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी ही संघटना महत्त्वाची भूमिका बजावेल, असे उपस्थित व्यक्तींनी दर्शवली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button