Uncategorized

कधी मिळणार विमा !शेतकऱ्याची आर्त हाक !

तेल गेले आणि तूप गेले हाती धुपाटनेच आले अशी अवस्था

सहसंपादक शेख मुजाहिद

उमरखेड :पिक विमा हा शेतकऱ्यांच्या हक्काचा असून, शेतकरी अहोरात्र कबाड कष्ट करून शेतात राब – राब राबहुन मेहनत करतात शासनाने शेतकऱ्यासाठी हक्काचा पिक विमा सुरु केला . शेतकऱ्यांनी स्वःताच्या हक्काचा पिक विमा ऑनलाईन असो व्वा ऑफलाईन भरणा केली शेतकऱ्यांची फार मोठी अकांक्षा अपेक्षा होती आपल्याला पिक विमा मिळणार पण पिक विम्यातून यवतमाळ जिल्हाच वगळून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पिक विम्यावर पाणी फिरले अशा प्रकारचे अवस्था झाली महायुती शासनाचा उपद्रव्यपणा वाढलाअशा प्रकारचे जनभावना जनसामान्यात चर्चेला उधान आले आहे. उमरखेड तालुक्यात जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक मुसळधार पाऊस झाला शेतकऱ्यांची नको ती अवस्था झाली पिकात पाणी नदी नाले च्या पाण्यामुळे सर्वत्र शेतीचे नुकसान झाले मातीसह पिके खरडून गेली पिकांची माती झाली तरी ही शासनाने उमरखेड तालुक्याला पिक विम्यापासून वगळले हा कोणता उपद्रवपणा , मराठवाडात पिक विमा मिळतो तर उमरखेड तालुक्याला का नाही पैनगंगा नदी काठावरील ४२ गावे आहे त्या गावाच्या शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन कापूस उडीद मुंग तूर ऊस हळद भाजीपाला या पिकात पाणी की पाण्यात पीक घुसले अशाप्रकारे अवस्था होती आठ – आठ दिवस पाणी उतरले नव्हते उमरखेड तालुका जलमय झाला होता पण शासनाने उमरखेड तालुक्यांची प्रचंड नुकसान झाले राज्याचे पालकमंत्री संजय राठोड तथा आमदार किसन वानखेडे कॉग्रेस पक्षाचे नेते माणिकराव ठाकरे , माजीगृहमंत्री अनिल देशमुख यांनी उमरखेड तालुक्यात अतिवृष्टी चा दौरा केला . पालकमंत्री , जिल्हाअधिकारी यांनी नुकशानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून पिक विम्यापासून कोणताही शेतकरी वंचीत राहता कामा नये असे आदेश पारीत केलेत तरीही यवतमाळ जिल्हयासह उमरखेड तालुका पिक विम्यापासून वंचित ठेवले हा कोणता खोडसाळपणा आहे पैनगंगा नदी पलीकडील शेतकऱ्याना पिकविमा कोट्यावधीचे पाटप झाले हा कोणता प्रकार आहे पण शेतकरी अगोदरच कर्जबाजारी नापीकी नैसर्गिक हाणीमुळे शेतकरी त्रस्त ! बेजार ! हैराण झाला असुन महायुती शासणाने पिक विम्यापासून वंचीताना न्याय कधी मिळणार? विदर्भातील शेतकऱ्यांनी एक जुठ होऊन या लढ्यासाठी प्रशासणाच्या विरोधात भुमीका प्रखर ठेवावी तरच काही लागेल शेतकऱ्यांच्या हक्काचा पिक विमा मिळाला पाहिजे अशी ठाम भुमीका ठेवणे काळाजी गरज आहे. यवतमाळ जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असुन या उमरखेड मतदार संघ हा भाजपाचा असताना लोकप्रतिधी कोठे कमी पडलेत की, विमा कंपनीशी निगडित आहेत काय?असा प्रश्न शेतकऱ्यांचा उपस्थित होत असताना दिसून येत आहे.तरी शासन प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन शेतकऱ्याच्या विमा विम्याच्या संदर्भात निर्वाडा करावा अशी शेतकरी वर्गात मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button