Uncategorized

भरधाव रेती टिप्परचा पुसदमध्ये कहर; दुचाकीला धडक देत दोघांचा जागीच मृत्यू


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पुसद येथे आज सकाळी भरधाव रेती टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघे जण मोटरसायकलने जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या रेती टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती.
महागाव-पुसद मार्गावर मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक सुरू असून भरधाव टिप्परमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. यापूर्वीही हिवरा येथे अशाच प्रकारच्या अपघातात अमोडा येथील युवकाचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात संबंधित वाहन “अनफिट” असल्याचे समोर आले होते. मात्र मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.


दरम्यान, पुसद येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी रेती वाहतूक करणाऱ्या सर्व टिप्परची तात्काळ तपासणी करावी, वाहनांचे इन्शुरन्स, फिटनेस प्रमाणपत्र, परवाने व इतर कागदपत्रांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
भरधाव व बेकायदेशीर वाहतुकीवर नियंत्रण आणले नाही तर भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटना घडू शकतात, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button