शहर

पुसद शहरात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; चार आरोपी अटकेत


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पुसद : पुसद शहरातील विहार लॉजमधील रूम क्रमांक १०५ येथे बनावट ५०० रुपयांच्या नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पुसद शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रासायनिक साहित्य व बनावट नोटांसह एकूण २ लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टीचर आयोडीन, सोडियम थायोसल्फेट, स्पिरिट, विशेष कागद आदी रासायनिक साहित्याचा वापर करून ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुसद शहर पोलिसांनी २२ मे २०२६ रोजी रात्री १२.२० ते १२.३० वाजण्याच्या सुमारास विहार लॉजवर छापा टाकून कारवाई केली.
या वेळी आरोपी बनावट नोटा तयार करताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून टीचर आयोडीन, सोडियम थायोसल्फेट, स्पिरिट, कागद तसेच बनावट नोटा असा मुद्देमाल जप्त केला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत : १) सुरेश किशन पेंद्राम (वय ४०) रा. डी. बी. कॉलनी, जन्नाराम, जि. मंचेरियाल (तेलंगणा)
२) अविनाश कुमार सुरेंद्र मालराज (वय ३७) रा. तिलकनगर, मंचेरियाल (तेलंगणा)
३) व्यंकटेश किशन जंगली (वय ३३) रा. गांधीनगर, जन्नाराम, जि. मंचेरियाल (तेलंगणा)
४) सय्यद साजिद सय्यद खाजा (वय ३५) रा. अशोक रोड, मंचेरियाल (तेलंगणा)
हे सर्व आरोपी तेलंगणा राज्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पुसद शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल चंद्रपाल इंद्राळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button