शहर

घनकचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने बकरीला चिरडले


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव शहरातील घनकचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने बकरीला चिरडल्याची घटना घडली. या अपघातात बकरीचा जागीच मृत्यू झाला. मृत बकरी नंदा ज्ञानेश्वर फोपसे यांच्या मालकीची असून त्यांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
माहितीनुसार, अपघातास कारणीभूत असलेले ट्रॅक्टर हे महागाव नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरले जात होते. मात्र हे ट्रॅक्टर कंत्राटदाराच्या ताब्यात असल्याची माहिती भाजपचे नगरसेवक सुरेश नरवाडे यांनी दिली. कंत्राटदाराने करारनाम्यानुसार घनकचरा वाहतुकीसाठी ट्रॅक्टर भाडेकराराने घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, संबंधित ट्रॅक्टर चालक अशोक काळे हे कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना बकरीच्या अंगावरून वाहन गेल्याने तिचा मृत्यू झाला. नंदा फोपसे या रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला असून त्यांच्या मालकीच्या तीन बकऱ्या घरासमोर बांधलेल्या होत्या. या घटनेमुळे त्यांचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बकरी मालकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button