शहर

उमरखेडमध्ये अतिक्रमण प्रकरण तापलं!

उपविभागीय अधिकाऱ्यांचा थेट आदेश; “अट क्रमांक ६ पूर्ण झाल्याशिवाय परवानगी नाही”

सहसंपादक शेख मुजाहिद मो नं. 7798306192

उमरखेड शहरातील गोरक्षण भागातील कथित अतिक्रमण आणि विक्री व्यवहार प्रकरण आता चांगलेच तापले असून प्रशासनाने अखेर कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड यांनी उपविभागीय अभियंत्यांना थेट पत्र पाठवून तात्काळ चौकशी व कारवाईचे आदेश दिल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत रेग्युलर क्रमांक २ च्या अहवालातील अटी व शर्तींची पूर्तता न करता गोरक्षण क्रमांक १ येथे प्लॉट विक्री व स्थापन व्यवहार सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे अहवालातील “अट क्रमांक ६” ची अंमलबजावणी न करताच संबंधितांकडून व्यवहार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी बसवेश्वर नंदकुमार शिरसागर यांनी प्रशासनाकडे लेखी अर्ज देऊन मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्वतः दखल घेत संबंधित विभागाला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

स्थानिक नागरिकांमध्ये आता संतापाची लाट असून, “प्रशासनाच्या डोळ्यादेखत नियमांची पायमल्ली सुरू होती का?”, “अट क्रमांक ६ मध्ये नेमकं काय दडलं आहे?”, “कोणाच्या आशीर्वादाने व्यवहार सुरू होते?” असे सवाल उपस्थित होत आहेत.

दरम्यान, या प्रकरणात महसूल विभाग, नगर प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून चौकशीत मोठे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उमरखेडमध्ये आता या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, नागरिकांचे लक्ष प्रशासन पुढे कोणावर कारवाई करते याकडे लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button