Uncategorized

शिरपूर येथे सिलेंडर ब्लास्ट; घराचे मोठे नुकसान


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील शिरपूर येथे बंद घरामध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन घराचे मोठे मंनुकसान झाल्याची घटना मंगळवार, १३ मे रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. उष्णतेच्या तीव्रतेमुळे ही घटना घडली असावी सुदैवाने घरातील सर्व सदस्य बाहेर गेले असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर येथील संजय राठोड यांच्या घराला कुलूप लावलेले होते. कुटुंबातील सदस्य काही कामानिमित्त बाहेर गेले असताना अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या दुर्घटनेत घरातील साहित्य तसेच पत्र्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगीमुळे घराचा काही भाग जळून खाक झाला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
प्राथमिक अंदाजानुसार गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. उष्णतेच्या वाढत्या तडाख्यामुळे सिलेंडरमध्ये दाब निर्माण होऊन दुर्घटना घडल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे. संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातील गॅस सिलेंडर, रेग्युलेटर व विद्युत उपकरणांची नियमित तपासणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button