विकासकामांत हलगर्जी चालणार नाही! – नितीनभाऊ भुतडा यांचा थेट इशारा

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
उमरखेड ते ढाणकी रस्ता अनेक महिन्यांपासून रखडला आहे.त्याचप्रमाणे उमरखेड–पुसद व उमरखेड–हरदडा रस्त्यांच्या कामांनाही कास लागली आहे.
या विलंबाबद्दल विकासकामात अडथळे आणणाऱ्यांना नितीनभाऊ भुतडांनी बैठकीतच धारेवर धरलं.बैठकीतच मॅनेजरवर संतापाचा पाऊस रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरला “जनतेचा रस्ता वेळेत झाला पाहिजे – नाहीतर जबाबदारी तुम्हाला!” असा थेट इशारा.
झाप झाप झापत हलगर्जीबद्दल स्पष्ट शब्दांत इशारा.भुतडांचा स्पष्ट संदेश :“जनतेचा पैसा वाया जाऊ देणार नाही.”“काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झालंच पाहिजे.”“अधिकारी किंवा ठेकेदार कुणीही सुटणार नाही.”
नेतृत्वाची ठाम पद्धत
नितीनभाऊ भुतडा हे जनतेचे प्रश्न ऐकून घेणारे आणि त्वरित कृती करणारे नेता आहेत.
ते हलगर्जीपणा करणाऱ्यांना कधीही वाव देत नाहीत,
आणि जागा दाखवायला क्षणाचाही विलंब करत नाहीत.
जनतेचा प्रतिसाद :
“रस्ता वेळेत पूर्ण झाला पाहिजे – भुतडांनी योग्य पाऊल उचललं.”
“अशा नेतृत्वाचीच जनतेला गरज आहे.”
“काम लांबणीवर टाकणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे.” नितीन भुतडा यांनी आपले ठाम मत मांडले



