Uncategorized

येणाऱ्या सन उत्सवांदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखा- भारत मुक्ती मोर्चासह अठरापगड जातीय संघटनांचे ठाणेदारांना निवेदन.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

भारत मुक्ती मोर्चा ही भारतातील ३१ राज्ये आणि ६५० जिल्ह्यांमध्ये काम करणारी एक राष्ट्रव्यापी सामाजिक संघटना आहे, जी संविधानाने परिकल्पित केलेल्या समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असते.त्यांनी अठरापगड जातीतिल विविध 10 संघटनांच्या माध्यमातून भारत मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वात आज निवेदन दिले.ज्यात

ढाणकी येथे गणेश उत्सव व इतरही सर्व सामाजिक धार्मिक उत्सवांदरम्यान शांतता आणि सांप्रदायिक सलोखा राखण्याच्या संविधानिक मागण्या पोलीस अधिक्षक कार्यालय यवतमाळ यांच्यासह पोलिस स्टेशन बिटरगाव ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या समोर मांडल्या आहेत. प्रमुख मागण्यांमध्ये हे समाविष्ट आहे,
गेल्या वर्षी गणेश विसर्जन वेळी उमरखेड तालुक्यातील ढाणकी परिसरात असामाजिक घटकांमुळे दंगलीच्या घटना घडल्या, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आणि सामाजिक सौहार्दाला मोठे नुकसान झाले.त्यामुळे यावेळेस
सुरक्षा उपाययोजना वाढवन्यासाठी संवेदनशील भागात, विशेषतः गणेश उत्सवादरम्यान, पोलिसांची उपस्थिती आणि सीसीटीव्ही देखरेख वाढवून दहा दिवस सतत व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे.विघटनकारी घटकांविरुद्ध कारवाई,


शांतता आणि सौहार्द समितीची स्थापना करणे यात संविधानातील निर्मित नागरी प्रवर्गातील सर्व समाजाचे 25% प्रमाणात लोक समाविष्ट करणे,
मिरवणुकांचे नियमनाचे पालन होत आहे का याचे निरक्षण करणे, मिरवणुकांसाठी नियुक्त केलेल्या मार्गांचे पालन करणे आणि कमी आवाज पातळी राखणे यावर भर देणे.
सर्व धर्मीय बांधवांच्या प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी विशेष सुरक्षा बंदोबस्त तैनात करावा.

पोलिस प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वाजणारी गाणी, पोस्टर्स किंवा सोशल मीडियाद्वारे जातीय तेढ पसरवण्यापासून असामाजिक तत्व आढळल्यास रोखावे आणि फुटीरतावादी मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी.
कोणत्याही राजकीय दबावात न येता संविधानाच्या प्रभावात प्रशासनाने कार्य करावे.

कायद्याचे निष्पक्षपणे काम करावे आणि संवैधानिक तत्त्वांचे पालन करून कोणत्याही विशिष्ट धार्मिक व्यक्तींना लक्ष्य करू नये.
उत्सव प्रतिष्ठापना आणि विसर्जनाच्या दिवशी पूर्णवेळ वीजपुरवठा सुनिश्चित केला पाहिजे.

भारत मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वात चक्रधर पाटील देवसरकर,प्रकाश कांबळे,समाधान पंडागळे, इंदल राठोड,कृष्ण पाटिल,दिगंबर कदम,प्रल्हाद मेंढके, बीमोद मुधाने,विकास गावंडे,टिळक राठोड,बाजीराव गायकवाड़,संजय बनसोडे अनिल लहाने,पुंडलिक तलवारे,मिलिंद चिकाटे,राजू हनवते, जयशील कांबळे,शुभम खंदारे,गणपत गव्हाळे,सुनील भोने,बबलू चव्हाण,यांसह अठरापगड जातीतील छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय किसान मोर्चा ,लहुजी क्रांती मोर्चा, बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क,राष्ट्रीय गोर बंजारा क्रांति संघ, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा,भारतीय विद्यार्थी, बहुजन मुक्ती पार्टी,बेरोजगार मोर्चा अशा विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.अठरापगड जातींनी एकत्र येऊन दिलेल्या सदर निवेदनाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

चौकट
“कुणी असामाजिक तत्त्व सार्वजनिक कार्यक्रमात संविधानाला अपेक्षित असणाऱ्या कायदा सुव्यवस्थेचा भंग करून धार्मिक तेढ निर्माण करणारे कृत्य करत असतील अशा असंवैधानिक तत्वाविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करावी.सौहार्दाला मोठे नुकसान करणाऱ्यावर विशेषतः लक्ष ठेवून कारवाई करून येणाऱ्या उत्सवांदरम्यान त्यांना निगराणीत ठेऊन बंदोबस्त करावा.” असे मत

          भारत मुक्ती मोर्चा च्या 

वर्षाताई देवसरकर तथा विद्वान केवटे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button