Uncategorized

कॉग्रेसपक्ष पुरपिडीतांच्या पाठिशी ( कॉग्रेस नुकसान भरपाईची मागणी लावून धरणार ; पदाधिकाऱ्यांना गावात राहुन मदत करण्याच्या सूचना )

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306193

उमरखेड :मागील पाच दिवसांपासून उमरखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी सदुष्य मुसळधार पावसामुळे शेकडो गावे संकटात सापडली आहेत. लाखाच्या जवळपास हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शेतकरी व पुर पिडितांना धीर देण्यासाठी कॉग्रेसचे नेत्यांनीही शहरापासून ते गाव पातळीवरील पदाधिकाऱ्यांना, चमकोगिरी न करता लोकांना मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नेत्यांनीही आनेक गावांना भेटी देत पुर पिडितांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे पुढे आले आहे.

दरम्यान काँग्रेसचे नेते तातू देशमुख यांनी बेलखेड, बारा , पळशी, दिवट पिंपरी, हातला , तीवरंग , झाडगाव, संगम चिंचोली अशा आनेक गावांना भेटी देत नागरिकांना दिलासा दिला. याशिवाय मतखंड, बंदीभागातील पदाधिकारीही ग्राऊंडवर लोकांच्या मदतीसाठी उपस्थित आहेत. उमरखेड शहरांमध्येही शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल यांनी पुरामुळे पाणी शिरलेल्या प्रभागांमध्ये भेटी देत, नागरिकांना दिलासा दिला. यावेळी शहर काँग्रेसचे पदाधिकारी ही उपस्थित होते.
उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटात काँग्रेस पक्षाने बूथ पर्यंतच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना सूचना देत, आपल्या गावातच राहून पूर पीडित शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मोर्चा सांभाळत, आपापल्या गावात व उमरखेड शहरामध्ये प्रभागात थांबून, नागरिकांना मदतिचा हात देण्याचे काम केले. पूर आलेल्या नदीकाठावरील व शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, या अतिवृष्टीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई, सरकारला भांडून मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कॉग्रेसच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button