Uncategorized

मोठ्या बातमीचा धमाका: अर्चना पाटलांचा ‘रुद्रावतार’; शिवनी तांड्यावर ऐतिहासिक ‘मास रेड’, विषारी दारूचे साम्राज्य उद्ध्वस्त!


​ | किनवट (प्रतिनिधी: शेख खयुम)
​किनवट: नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील शिवनी सर्कल आणि शिवनी तांडा परिसरात आज खाकीचा अभूतपूर्व दणका पाहायला मिळाला. अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी ८ पोलीस अधिकारी आणि मोठ्या फौजफाट्यासह पहाटेच अवैध धंद्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. या धडक मोहिमेने संपूर्ण जिल्ह्यात अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
​आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर प्रहार
मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना पाटील यांनी स्वतः या मोहिमेचे नेतृत्व करत शिवनी गावातील घराघरांची कसून झडती घेतली. यावेळी मानवी शरीरास अत्यंत घातक असलेली हजारो लिटर मोहफुलांची दारू आणि चक्क ड्रग्ज वापरून तयार केलेली बनावट शिंदी जप्त करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरील रसायनयुक्त साहित्याचा मोठा साठा जागीच नष्ट करून अवैध अड्ड्यांचे कंबरडे मोडले आहे.
​गुन्हेगारांमध्ये दहशत, नागरिकांकडून स्वागत


अचानक झालेल्या या ‘मास रेड’मुळे गुन्हेगारांची मोठी पळापळ झाली. पोलिसांनी अनेक संशयितांना बेड्या ठोकल्या असून कडक कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
​मार्गदर्शन:
अर्चना पाटील (अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड)
अमोल भगत (पोलीस निरीक्षक, हिमायतनगर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button