Uncategorized

महागाव तालुक्यात उटी येथे धाडसी जबरी 14 लाखाची चोरी; लुशी डॉग युनिटचे पाचारण


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव, दि. २ मे २०२६ – तालुक्यातील उटी येथे शनिवार मध्यरात्री धाडसी जबरी चोरीची घटना घडली असून, अनिकेत राजू गावंडे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत अंदाजे दहा ते बारा लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. ही घटना रविवार सकाळी उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी लुशी डॉग युनिट पाचारण करण्यात आले असून, श्वानपथक नदीकाठाने शेताच्या दिशेने गेल्याची माहिती आहे. चोरीनंतर चोरट्यांनी घरातील मोटारसायकलही घेऊन पलायन केल्याचे निदर्शनास आले.
घटनास्थळी एपीआय सुनील अंभोरे, महागाव पोलीस स्टाफ, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच एलसीबी पथकाने भेट देऊन पाहणी केली.
स्थानिक नागरिकांच्या मते, महागाव तालुक्यात अलीकडे अवैध पत्त्यांच्या क्लबमुळे बाहेरगावच्या संशयित व्यक्तींची वर्दळ वाढली असून, त्यामुळे गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विशेषतः कलगाव येथे सुरू असलेल्या पत्त्यांच्या क्लबनंतर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वावर वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
यापूर्वी फुलसावंगी व चिल्ली परिसरात मोठे दरोडे पडले होते. तसेच खडका पुलावर लुटमारीच्या अनेक घटना घडल्याचेही सांगण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी जिल्हा पोलीस प्रशासनाकडे अवैध धंदे व पत्त्यांचे क्लब तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच गावागावांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत वरिष्ठ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे, अशी मागणी गावंडे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button