एसआयआर कॅम्प’बाबत प्रशासकीय अनास्था; माजी उपनगराध्यक्ष जाविद व शेख सालीम शेवालकर यांच्या पुढाकाराने अधिकृत कॅम्प संपन्न!

हिमायतनगर (तालुक प्रतिनिधी शेख खय्यूम): शहरात ‘एसआयआर कॅम्प’बाबत (SIR CAMP) नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम व भीतीचे वातावरण होते. हीच अडचण ओळखून १४ जुलै २०२६ रोजी खुबा मशीद परिसरात माजी उपनगराध्यक्ष मो़ जाविद आणि शेख सालीम शेवालकर यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
नागरिकांसाठी टेंट व पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आली होती. स्वतः तहसीलदार डॉ. पल्लवी टेमकर मॅडम यांनी या कॅम्पला भेट देऊन कामाची पाहणी केली. त्यांच्या आदेशानुसार अधिकृत बी.एल.ओ. (BLO) अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून लोकांचे फॉर्म भरून घेण्याचे काम गतीने पूर्ण केले. या उपक्रमाची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण गावात ऑटो फिरवून प्रचार करण्यात आला होता.
गोरगरीब जनतेला मोठा दिलासा:
जाविद भाई, अब्दुल बाखी शेख सालीम शेवालकर, फेरोज खुरेशी, शेख असलम शेवालकर, शेख सलीम डंगी, शेख अफरोज आणि आवेस खुरेशी यांच्या पुढाकारामुळे गरीब नागरिकांची मोठी अडचण जागच्या जागी दूर झाली. शासकीय अधिकारी स्वतः उपस्थित असल्याने लोकांची फॉर्म भरण्यासाठी होणारी धावपळ थांबली आणि नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले.
सत्ताधाऱ्यांवर अब्दुल बाकी यांचा आरोप:
यावेळी अब्दुल बाखी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना म्हटले, “प्रभाग ३ मधील जनतेला मदत करण्याची स्थानिक नगरसेविका, प्रथम नगराध्यक्ष किंवा नगराध्यक्षांची इच्छाशक्ती व लक्ष दिसले नाही. सत्ताधाऱ्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडल्यामुळेच आम्हाला हा अधिकृत कॅम्प लावावा लागला.”
हा जनहितैषी कॅम्प यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.



